चार महिन्यांपासून मंत्र्यांच्या खासगी सचिवांना पगारच नाही!
मुंबई : खरा पंचनामा
बिनपगारी फुल्ल अधिकारी, अशी अवस्था मंत्र्यांच्या खासगी सचिवांची, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची झाली आहे. कारण मागील चार महिन्यांपासून त्यांचा पगारच झालेला नाही. आणि पुढे कधी पगार होणार याची देखील कल्पना त्यांना नाही. त्यामुळे त्यांच्यावर उसणवारी करण्याची वेळ आली आहे. सचिवांची नियुक्ती मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्यांच्या चारित्र पडताळणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.
प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्याची नियुक्ती होत असल्याने नियुक्तीला उशीर होत आहे आणि बँकेतही पगार जमा होत नसल्याचे सांगितले जात आहे. शेकडो अधिकाऱ्यांचा पगार जमा झाला नसल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काही पीए, खासगी सचिव यांच्या विषयी तक्रारी येत होत्या. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना लगाम घालण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मंत्र्यांकडे खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि स्टाफच्या नेमणुकीला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आवश्यक केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी पीए, खासगी सचिव यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानी आवश्यक केली होती. तोच फॉर्म्युला त्यांनी यावेळीही कायम ठेवला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.