राज्यात आता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य
राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात एकीकडे यावर्षीपासून सीबीएससी पॅटर्न शिकवण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता मराठीसोबत हिंदी विषय देखील अनिवार्य करण्यात आला आला आहे.
आगामी शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकण्याच्या निर्णायावर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तब केले आले आहे. त्यामुळे राज्यात आता यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. जून 2025 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता तिसरी भाषा म्हणून हिंदीचा अभ्यास अनिवार्य असेल. कारण सध्या दोन भाषा शिकण्याची प्रचलित पद्धत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील या वर्गासाठी तीन भाषांचा फॉर्म्युला आखण्यात आला आहे.
राज्य शालेय शिक्षण विभागाने बुधवारी शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय आर्थिक धोरण 20220 च्या शिफारशींनुसार तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रम चौकटीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी योजना जाहीर केली. या संदर्भात जाहीर केलेल्या सरकारी निर्णयात (जीआर) स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील इतर माध्यमांच्या शाळा आधीच त्रिभाषिक सूत्राचे पालन करत आहेत. कारण राज्यात इंग्रजी आणि मराठी भाषा अनिवार्य आहे आणि त्या त्यांच्या शिक्षणाचे माध्यम असलेली भाषा देखील शिकवतात. तर इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त दोन भाषा शिकवल्या जात होत्या.
मराठी माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त इतर माध्यमांच्या शाळांमध्येही पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा शिकवल्या जाणार आहेत. यामुळे मराठी भाषेसोबतच आता हिंदीलाही प्रोत्साहन मिळणार आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकली जाणार आहे. तसेच अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकवल्या जातील.
महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून हे महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) तयार केलेल्या पायाभूत व शालेय स्तरावरील अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने मान्यता दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.