शेतकऱ्याला लुटणाऱ्या चौघाना अटक
चोरट्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश
जळगाव : खरा पंचनामा
चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे ३५ हजार रूपये घेवून पळणाऱ्या चार चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यात धक्कादायक म्हणजेच या चोरांमध्ये जालना येथील पोलिस उपनिरीक्षकचा समावेश असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
प्रल्हाद पिरोजी मान्टे (वय ५७) असं या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, प्रल्हाद मान्टे याने चोरी केल्याची कबुली दिली.
बुधवारी चोपडा बसस्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वाळकी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे ३५ हजार रूपये बसस्थानकातून चोरी झाले. पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कार (क्र एम एच-४३ एन-२९२८ व) या कारचा पाठलाग केला.
चोपडा-धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह चोरांना अटक केली. त्यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मान्टे (वय-५७, रा., सदर बाजार जालना) श्रीकांत भिमराव बघे (वय-२७ रा. गोपालनगर खामगाव) अंबादास सुखदेव साळगावकर (४३ रा. माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला, रउफ अहमद शेख (४८रा महाळस तालुका जिल्हा बीड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत. तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, प्रल्हाद पिराजी मान्टे तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होता. मात्र त्यापूर्वी चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी आला होता. प्रल्हाद मान्टे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पकडले जावू नये म्हणून तो कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नव्हता. कारमधून स्वयंपाक बनवण्याचे साहित्य, अंथरूण-पांघरून ताब्यात घेण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.