Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विकसित रिफ्लेक्टरच्या माध्यमातून वाचवले हजारो लोकांचे प्राण!पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या कार्याची दखल घेत इंडिया बूक रेकाॅर्डने केला सन्मान

विकसित रिफ्लेक्टरच्या माध्यमातून वाचवले हजारो लोकांचे प्राण!
पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या कार्याची दखल घेत इंडिया बूक रेकाॅर्डने केला सन्मान

सांगली ः खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत असताना २०१७ मध्ये उस वाहतूक वाहनांच्या कापडी रिफ्लेक्टर विकसित करून तो वाहनांना लावण्यासाठी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी पुढाकार घेतला. त्यावेळपासून आतापर्यंत त्यांनी उस वाहतूक वाहनांना कापडी रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्यांनी सलग आठ वर्षे या मोहिमेत सातत्य ठेवल्याची दखल घेतल इंडिया बूक रेकाॅर्डने इस्लामपूरचे सध्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.
दरवर्षी उस वाहतूकीच्या वाहनांचा अंदाज न आल्याने उस पट्ट्यात हजारो लोकांनी अपघातात प्राण गमावले होते. नादरूस्त किंवा संथ गतीने जाणाऱ्या उस वाहतूक वाहनांना अंदाज न आल्याने अनेकदा गंभीर अपघात होत होते. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. श्री. हारूगडे कुरळप पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अशा अपघातातील जखमींची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी रस्त्यातच नादरुस्त असलेले उस वाहतूक वाहनाचा तसेच संथ गतीने जाणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने बहुतांश अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी अशा वाहनांना रात्रीच्या वेळी लक्षात येतील असे रिफ्लेक्टर लावण्याची कल्पना सूचली. त्यानंतर त्यांना साखर कारखान्यांच्या तसेच काही संस्थांच्या मदतीने उस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम सुरू केली. त्यानंतर अपघातामध्ये काही प्रमाणात घट झाली मात्र श्री. हारूगडे यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी याचा खोलवर अभ्यास करून रिफ्लेक्टर विकसित केले. असे विकसित केलेले रिफ्लेक्टर त्यांनी उस वाहतूक वाहनांना बसवले. त्यानंतर त्यांना अपघातात कमालीची घट झाल्याचे निदर्शनास आले.

ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची पोस्टिंग जिथे असेल त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत उस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम आजपर्यंत सुरूच ठेवली आहे. सध्या ते इस्लामपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली आठ वर्षे सातत्याने वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची त्यांची मोहीम सुरूच आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे गेल्या आठ वर्षात हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंडिया बूक रेकाॅर्डने नुकताच सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच पोलिस ठाण्याचे दैनंदिन कामकाज, बंदोबस्त, प्रशासकीय काम करत निरीक्षक हारूगडे यांनी केलेले कार्य अनेकांना जीवनदायी ठरले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान झाल्याबद्दल पोलिस दलासह विविध, संस्था, संघटना यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.