सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाची राज्यसरकारला नोटीस
मुंबई : खरा पंचनामा
परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी झाली. ऍड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली आहे. ये सुनावणी दरम्यान काय झालं हे त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक व्हावी अशी मागणी आहे.
न्यायालयीन कोठाडीत मृत्यू झाल्यावर मॅजेस्ट स्टेटमेंट चौकशी केल्यानंतर पुढे काय करावे ? याविषयीचा कायदा अपूर्ण आहे .त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात नियमावली तयार करावी अशी मागणी न्यायालयाने केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी अशी मागणी न्यायालयाने केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आम्ही एसआयटी नेमण्याची मागणी केली. ही एसआयटी कोर्टाने नेमावी आणि कोर्टाच्या अधिपत्याखाली ती चालावी. मध्यंतरी गुन्हे अन्वेषण विभागाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत चौकशी केली होती. पुढच्या सुनावणीच्या वेळी सीआयडी ला आरोपी करू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे. हायकोर्टाकडून राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस जारी करण्यात आली आहे. 29 एप्रिल पूर्वी आपले म्हणणे सादर करायला न्यायालयाने सांगितले आहे . याप्रकरणी 29 एप्रिलला पुढील सुनावणी होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.