Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीडचा दौरा टाळणारे धनंजय मुंडे अखेर अजितदादांसोबत दिसले !

बीडचा दौरा टाळणारे धनंजय मुंडे अखेर अजितदादांसोबत दिसले !

मुंबई : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच बीडचा दौरा केला होता. या दौऱ्यात धनंजय मुंडे अनुपस्थित होते. मुंडे यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित राहिले नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्याच दिवशी ते मुलीच्या फॅशन शोमध्ये दिसले. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अखेर अजित पवार आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एकत्र दिसले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईतील निवासस्थान देवगिरी येथे बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीच्या लॉनवर खुर्य्या मांडण्यात आल्या होत्या तेथे राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी बसले होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. या बैठकीत अजितदादांना मार्गदर्शन देखील केले.

आसनव्यवस्थेमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान धनंजय मुंडे यांना देखील मिळाला. धनंजय मुंडे यांच्या शेजारी माजी आमदार नवाब मलिक बसले होते. त्यानंतर दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांची खुर्ची होती. मंत्री नरहरी झिरवळ आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील अजितदादांच्या शेजारीच बसले होते.

राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सर्व आमदार, नेते वेळेवर हजर होते. मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आले. त्यांना पाहाताच उशीरा आल्याने अजितदादांनी खडसावले. कोकाटे हे मीडियासमोर वादग्रस्त वक्तव्य करतात, जनता दरबारला देखील अनुपस्थित असतात यावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केल्याचे समजते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.