लग्नाआधीच जावयाने सासू पळवून नेली!
अलीगड : खरा पंचनामा
अलीगडमधील एका आईने असं काही केलं ज्याची कल्पनाही करता येणार नाही. लेकीचं लग्न ज्या पुरुषासोबत होणार होतं, त्याच्यासोबत आई पळून गेली. मुलीच्या लग्नाची तारिख जवळ येत असल्याचं लक्षात येताच आई जावयासोबत पळून गेली.
दोघांत्या लव्ह कनेक्शनचं माध्यम होतं स्मार्टफोन... जो मुलीच्या आईला जावयाने भेट म्हणून दिलेला. दोघे एकमेकांसोबत 20 तासांपेक्षा अधिक वेळ गप्पा करत असायचे.
ही घटना अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावातील आहे, जिथे जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्रची पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दोघांनी एकत्र पळ काढला आहे. दोघे घरातून जवळपास त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत.
जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु होती. नातेवाईकांना पत्रिका देखील पाठवण्यात आल्या होत्या. घरात आनंदी वातावरण होतं. पण अचानक पत्नी घरातून गायब झाली. पत्नी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेली असावी.. असं जितेंद्र यांना वाटलं. पण असं काहीही नव्हतं.
त्यानंतर नवरा मुलगा देखील त्याच्या घरातून पळून गेला आहे... असं कळलं... अनेक ठिकाणी विरपूस केल्यानंतर, मोबाईलची माहिती मिळवल्यानंतर, एक धक्कादायक सत्य समोर आलं. पत्नी आणि होणारा जावई एकत्र पळून गेले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे काही दिवसांपूर्वी महिलेच्या जावयाने तिला एक महागडा स्मार्टफोन भेट दिला होता आणि त्याच फोनद्वारे दोघेही रात्रंदिवस संपर्कात राहिले.
मुलीचे वडील जितेंद्र म्हणाले, 'मी बंगळुरूमध्ये काम करतो आणि महिन्यातून एक-दोन वेळा घरी येतो. मी मागच्या वेळी आलो तेव्हा मी पाहिले की माझी बायको माझ्या मुलीचे लग्न ज्या मुलाशी ठरले होते त्याच्याशी जास्त बोलत होती. पण मी दुर्लक्ष केलं...'
'पण जेव्हा मला कळलं नवरा मुलगा दिवसातील 24 तासांमध्ये 20 - 22 तास सासूसोबत बोलतोय. माझ्या मुलीसोबत फार कमी बोलत आहे, तेव्हा संपूर्ण प्रकरण माझ्या लक्षात आलं. लग्नासाठी घरातील पैसे देखील घेवून गेली आहे. आता सर्वकाही संपलं आहे.
मुलगी शिवानी म्हणाली, 'माझ्याच आईने माझं आयुष्या उद्ध्वस्तत केलं आहे. जेव्हा मी मुलाला विचारायची काय करतोय, तेव्हा त्याचं एकच उत्तर असायचं आणि ते म्हणजे लग्नाच्या कामात व्यस्त आहे. पण तो माझ्या आईसोबत व्यस्त असायचा. आई सर्वकाही त्याच्या सांगण्यावर केलं आहे. आता माझ्या आयुष्यात तिचं काहीही महत्त्व नाही. आम्हाला फक्त आमचं सामान हवं आहे...'
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यात फसवणूक, विश्वासघात आणि मालमत्तेची चोरी यासारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे. महिला आणि तरुणाचा शोध सुरु आहे. मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.