Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इकडे हायकोर्टाचा सरकारला दणका अन् तिकडे त्याचे पालकच बेपत्ताअक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण

इकडे हायकोर्टाचा सरकारला दणका अन् तिकडे त्याचे पालकच बेपत्ता
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण

मुंबई : खरा पंचनामा

बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नुकतीच मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला दणका देत या प्रकरणाशी संबंधित 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

शिवाय आता या एन्काउंटरची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे.

मात्र, एकीकडे कोर्टाने पोलिसांविरोधात एफआयआर , एकीकडे कोर्टाने पोलिसांविरोधात एफआयआर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे अक्षय शिंदेचे पालक मागील दीड महिन्यापासून बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवाय शिंदेचे कुटुंबीय त्यांची बाजू कोर्टात मांडणाऱ्या वकिलांच्याही संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर बनावट असून आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी त्याच्या पालकांनी न्यायालयात दाद मागण्यासाठी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. मात्र, वकील कटरनवरे यांच्या संपर्कात देखील अक्षयचे पालक नसल्याची माहिती समोर आली आहे.

वकील कटरनवरे म्हणाले, "अक्षयच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिल्यापासून ते माझ्या संपर्कात नाहीत. ते सध्या कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत याची आपल्याला कल्पना नाही."

तर, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करण्याच्या आदेशानंतर त्याचे पालक अचानक संपर्काबाहेर गेले असून त्यांच्या घराला कुलूप आहे. ते अंबरनाथमध्ये ज्या मावशीकडे रहात होते तेथूनही त्याचे पालक निघून गेले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.