मध्यरात्री घरातून बोलावून पाठलाग करत तरुणावर हल्ला
सांगलीतील घटना : तिघे संशयित ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
शहरातील वान्लेसवाडी येथे मध्यरात्री तरुणाला घरातून बाहेर बोलावून पाठलाग करत धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झासा असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले. याप्रकरणी चौघांविरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश प्रवीण सावळकर (वय १७, रा. वानलेसवाडी, हायस्कूल रोड, सांगली) असे जखमीचे नाव आहे. मेघनाथ सोनभोईर, शुभम पारसे, संदेश अपराज अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तर राहुल भगत हा पसार झाला आहे. जखमी यश हा पेंटीगचे काम करतो. तो वान्लेसवाडी परिसरात आबा पाटील यांच्या घरी भाड्याने राहतो. तो व संशयित एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपूर्वी संशयित मेघनाथ व त्याचे साथीदार वान्लेसवाडीत वेगाने दुचाकी चालवत जात होता. यावेळी यश याने त्याला अडवून दुचाकी सावकाश चालवत जा, अशी समज दिली होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी संशयित शुभम याने तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली होती.
या भांडणाचा राग धरून रात्री दोनच्या सुमारास संशयित तिघांनी यशला घराबाहेर बोलाविले. तो घराबाहेर आला. त्यावेळी संशयितांनी वाद घातला. त्यानंतर यशला मारहाण करण्यात आली. स्वतःला वाचवण्यासाठ यश पळू लागला. त्याचा पाठलाग करीत त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढविला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांच्या शोधासाठी पथकेही रवाना करण्यात आली. विश्रामबाग पोलिसांनी तीन तासात मेघराज सोनभोईर, शुभम पारसे, संदेश अपराज या तिघांना अटक केली. सहायक निरीक्षक चेतन माने तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.