कुस्तीच्या फडात पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर पैलवानाचा हल्ला
धाराशिव : खरा पंचनामा
धाराशिव येथे भूम तालुक्यामधील आंदरूड गावात यात्रेच्या कुस्तीच्या फडात पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर एका पैलवानाने हल्ला केला. त्यादरम्यान तो तिथून फरार झाला असून, जामखेड गावचा तो पैलवान असल्याची माहिती समोर आली आहे.
सागर मोहोळकर असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो पेशाने पहिलवान असून, शुक्रवारी (११ एप्रिल) रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. सागर हाही येथे आला होता. नीलेश घायवळही कुस्ती पाहायला आला होता. यावेळी तो आयोजकांसोबत पहिलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसासमोरच हाणामारी करून गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घायवळवर हल्ला करणारा सागर सध्या वाशी पोलीस ठाण्यात असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, असा काही एक प्रकार झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.