एकनाथ शिंदेंना रायगडावर मानाचे पान
रायगड : खरा पंचनामा
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाच्या नियोजनानुसार यावेळी भाषण करणाऱ्याच्या यादीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नावे नव्हती. मात्र, ऐनवेळी नाराजीनाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आग्रहानंतर एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली.
रायगडावरील कार्यक्रमात शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली. यावेळी सूत्रसंचालकानी भाषणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी फडणवीस यांच्या आग्रहानंतर ऐनवेळी एकनाथ शिंदेंना भाषण करण्याची संधी देण्यात आली. तसा आग्रह ऐनवेळी शिंदेंना करण्यात आला. त्यानुसार शिंदेंनी पाच मिनिटांत भाषण आटोपते घेतले.
या ठिकाणच्या कार्यक्रमाच्या प्रोटोकालनुसार खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरवातीला भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाषण करतील असा क्रमही ठरला होता. मात्र, ऐनवेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना रायगडावर मानाचे पान देत नाराजी नको म्हणून ऐनवेळी त्यांना भाषणाची संधी देण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी ऐन शेवटच्या क्षणी शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली. दुसरीकडे मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.