Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाहतूक नियम तोडला, परिवहन मंत्र्यांचेच कापले चलान..

वाहतूक नियम तोडला, परिवहन मंत्र्यांचेच कापले चलान..

मुंबई : खरा पंचनामा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रस्ते नियमांचे महत्त्व विषद केले, ते सांगतानाच त्यांनी स्वतःचा देखील एक किस्सा सांगितला. मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवर त्यांना एकदा नव्हे तर दोनदा दंड भरावा लागला होता. अशी आठवण त्यांनी सांगितली.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते, ते म्हणाले मी वांद्रे-वरळी सी लिंक बांधला. मुंबईत माझी एक गाडी आहे, पण त्याच सी लिंकवर मला दोनदा चलान बजावण्यात आलं होतं. चलानपासून कोणीच वाचू शकत नाही. कॅमरा सगळं काही टिपत असतो. तेव्हा मला 500 रुपयांचा दंड बरावा लागला होता. दंड भरावा लागल्याबद्दल लोकं बऱ्याच वेळा तक्राकॉर करत असतात, कूरकूर करतात, पण कोणीच नियमांचं उल्लंघन करू नये. दंड हा महसूल निर्माण करण्यासाठी बजावला जात नाही, असे नितीन गडकरी स्पष्टच बोलले.

रस्ते टोलमुक्त होण्याची शक्यता काय आहे याबद्दल नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, रस्ते टोलमुक्त करण्याच्या धोरणावर काम सुरू आहे, ज्यामुळे टोल भरणाऱ्यांना दिलासा मिळेल. 8-10 दिवसांत त्याची घोषणा केली जाईल. सध्या मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की टोल 100% कमी केला जाईल, असे त्यांनी नमूद केलं.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत याबद्दलही नितीन गडकरी बोलले. अपघात 50% कमी करण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, दुर्दैवाने, आपण (ते) लक्ष्य साध्य करू शकलो नाही. अपघातांच्या कारणांमध्ये रस्ते आणि ऑटोमोबाईल इंजीनियरिंग यांचा समावेश आहे. जी वाहनं बनवण्यात आली ती खूप चांगल्या स्थितीत आहे. रस्ते इंजिनिअरिंगमध्ये त्रुटी होत्या, आम्ही ब्लॅक स्पॉट ठीक करण्यासाठी 40, 000 कोटी रुपये खर्च केलं. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना राहवीर योजनेअंतर्गत आम्ही 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आम्ही हे देखील कव्हर करण्याचा विचार करत आहोत. जखमींच्या उपचाराचा खर्च आम्ही पंतप्रधानांकडे मागितला आहे, असे त्यांनी नमूद केलं.

रस्ते अपघातांबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, दुसरा घटक म्हणजे लोकांचा स्वभाव. आम्हाला लोकांना रस्त्याचे नियम शिकायचे आहेत. पादचाऱ्यांसह दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांनाही वापरता येईल असा पादचारी पूल बांधण्याची योजना आम्ही आखत आहोत, असेही त्यांनी नमूद केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.