तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा ड्रग्ज प्रकरणात हात, 35 जणांवर गुन्हा दाखल
तुळजापूर : खरा पंचनामा
तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीच्या चर्चा ऐकू येत होत्या. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये थेट पुजारीच सापडले होते.
त्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील दोषी पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मंदिर प्रवेशबंदी करण्यात येणार असून, ही कारवाई तातडीने अंमलात आणली जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोहे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस आणि मंदिर प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंदिर संस्थानने त्वरित पावलं उचलली आहेत.
ड्रग्ज तस्करीत काही पुजाऱ्यांचा सहभाग असल्यानं तुळजाभवानी मातेची बदनामी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी डॉ. गोहे यांच्याकडे केल्या होत्या. दौऱ्यादरम्यान या तक्रारी समोर आल्यानंतर त्यांनी पोलिस आणि मंदिर प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन कडक कारवाईचे निर्देश दिले. या प्रकरणात आतापर्यंत 35 जणांना आरोपी करण्यात आलं असून, 80 जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या पुजाऱ्यांवरही मंदिर प्रवेशबंदीची कारवाई होणार आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान ही कारवाई 'देऊळ ए कवायत कायदा' अंतर्गत करणार असून, ड्रग्ज तस्करीत सहभागी पुजाऱ्यांची नावं लेखी स्वरूपात मागवली जाणार आहेत. जिल्हाधिकारी तसंच मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली पुढील कारवाई येत्या 1-2 दिवसांत होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे मंदिराचं पावित्र्य भंग झाल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे, तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे, अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे, शाम भोसले, संदीप टोले, जगदीश पाटील, विशाल सोंजी, आकाश अमृतराव, दुर्गेश पवार, रणजित पाटील, नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
यातील अमित उर्फ चिमू आरगडे, युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे, पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके, राहुल कदम - परमेश्वर, गजानन हंगरगेकर हे 14 जण धाराशिव जेलमध्ये आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.