'साहेब, तुमच्या मुलाची सुपारी घेतलीय, सावध राहा'
बुलढाणा : खरा पंचनामा
शिवसेना शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याला इशारा देणारं पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. या पत्रातून संबंधित शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाच्या हत्येचा कट शिजत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुलाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली असून त्या संदर्भात एक मिटींग पार पडली आहे, असा दावा देखील या पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्र मिळलेल्या नेत्याचं नाव संजय गायकवाड असून ते बुलढाण्याचे आमदार आहेत. संजय गायकवाड यांचा धाकटा मुलगा मृत्यूंजय गायकवाड याच्या जीवाला धोका असल्याचं पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा अशाच प्रकारचं पत्र गायकवाड यांना मिळालेलं आहे. आता तिसऱ्यांदा हे पत्र मिळाल्यानंतर गायकवाड यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आहे. अज्ञात व्यक्तीने हे पत्र पाठवलं असल्याची माहिती आहे.
तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण की, तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे. तुमचे जुने सहकारी समाधान मोरे व त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्यामुळे तुमचा धाकटा मुलगा मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्याची सुपारी घेतली असून ते त्या कार्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यांची अशी एक मिटिंग देखील झाली आहे. तरी आपण व आपले कुंटुंब त्यांचे रक्षण करावे. मी त्याच्या जवळची व्यक्ती असून मी प्रकट स्वरूपात येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे. वेळ निघून गेल्यावर काहीही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. तुमचे आणि माझे ही. शिवरायांच्या चरणाची शपथ हा मजकूर खोटा नाही. आपण सतर्क राहावे."
या पत्राच्या शेवटी अज्ञात व्यक्तीने टीपही लिहिली आहे. त्याने टीपमध्ये लिहिलं की, पत्रातील मजकूर हा खोटा नसून हा सत्य आहे. यामध्ये माझा कोणताच वैयक्तिक फायदा नाही. केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजी आहे, म्हणून पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे. मृत्यूंजय दादांची काळजी घ्या, आई भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना, आपला शुभचिंतक असा मजकूर या पत्रामध्ये लिहण्यात आलेला आहे. दरम्यान यापूर्वी देखील 2 अशीच पत्र आल्याने आमदार संजय गायकवाड यांनी आता या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलणार आहेत. मात्र हे पत्र कोणी पाठवलं, हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.