नागपंचमीसाठी कायद्यात सुधारणा करा
खासदार माने, आमदार देशमुख यांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट
सांगली : खरा पंचनामा
'नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जगप्रसिद्ध असणाऱ्या शिराळा नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे. नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करावी,' अशी मागणी खासदार धैर्यशील माने व आमदार सत्यजित देशमुख यांनी केली.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, "पूर्वीपासून शिराळा येथे घरोघरी जिवंत नागाची पूजा केली जात होती. परंतु, सन २००२ पासून काही निसर्गप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने जिवंत नागपूजा बंद झाली आहे. नागपंचमी ही शिराळा येथील लोकांची अस्मित्ता आहे. नागपंचमी जगप्रसिद्ध असल्यामुळे येथे देश-विदेशातून पर्यटक व नागप्रेमी येत असतात. न्यायालयाच्या बंधनात नागपंचमी अडकल्याने यांचा परिणाम या नागपंचमीवर झाला आहे. त्यामुळे ही नागपंचमी पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने सुरू व्हावी, त्यासाठी खास बाब म्हणून वन्यजीव कायद्यामध्ये सुधारणा व्हावी."
केंद्रीय मंत्री शहा यांनी नागपंचमीबाबत सकारात्मक विचार केला जाईल, मी विधानसभा निवडणुकीत लोकांना वचन दिले आहे. त्यांची पूर्तता केली जाईल. नागपंचमी हा सण शिराळाकराच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे या विषयी केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही दिली. आमदार सत्यजित देशमुख यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प, विकासात्मक कामाबाबत सविस्तर मंत्री शहा यांच्यासोबत चर्चा केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.