Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

IAS अधिकाऱ्याकडे मुंबई ते केरळपर्यंत कोट्यवधींची संपत्ती कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशीच्या जाळ्यात

IAS अधिकाऱ्याकडे मुंबई ते केरळपर्यंत कोट्यवधींची संपत्ती 
कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशीच्या जाळ्यात

मुंबई : खरा पंचनामा

देशातील काही अधिकारी आपल्या कामगिरीमुळे चर्चेत असतात. काही अधिकारी आपल्या संपत्तीमुळे चर्चेत येतात. बिहारमधील IAS अधिकारी संजीव हंस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी ईडीचा छापा पडला होता.

त्या छाप्यानंतर आता केरळमधील एक आयएएस अधिकारी चर्चेत आला आहे. त्यांची मुंबई ते केरळपर्यंत कोट्यवधीची संपत्ती आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयएएस के. एम. अब्राहम याच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. केएम अब्राहम केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे माजी प्रधान सचिव आहेत. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचे आरोप झाले आहे.

केरळ उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते जोमोन पुथेनपुराक्कल यांनी केएम अब्राहम यांच्या संपत्तीबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती के बाबू यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाने अब्राहम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीबीआयला दिले. सीबीआयचे कोच्ची युनिट या प्रकरणाचा तपास करणार आहे. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्याचे आदेश दिले आहेत.

दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (VACB) कडून मागील तपासातील अपुरेपणा न्यायालयाने अधोरेखित केला. न्यायालयाने म्हटले आहे की, दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरोने केलेल्या तपासाची विश्वासार्हता संशयास्पद आहे. त्यांचा तपास जनतेमध्ये विश्वास निर्माण करु शकत नाही. व्हीएसीबीने अब्राहम यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांच्या अहवालातून दिसत आहे. जाणूनबुजून त्यांच्याकडून झालेल्या महत्त्वपूर्ण मालमत्ता अधिग्रहणांना वगळले होते.

याचिकाकर्ता जोमोन यांनी अब्राहम यांच्यावर आरोप केले आहे. 2000 ते 2015 दरम्यान त्यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचे म्हटले आहे. त्यात तीन संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे मुंबईतील तीन कोटींचे अपार्टमेंट आहे. तिरुवनंतपुरममध्ये एक अपार्टमेंट आणि कोल्लम येथे आठ कोटी रुपयांचे तीन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.