Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुबईतील सूत्रधाराची हवी माहिती; 'एनआयए'कडून राणाची कसून चौकशी

दुबईतील सूत्रधाराची हवी माहिती; 'एनआयए'कडून राणाची कसून चौकशी

नवी दिल्ली : खरा पंचनामा

२००८ च्या मुंबई हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक तहव्वूर राणा याची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान 'एनआयए'ला असेही समजले, की या हल्ल्यामागे दुबईतील अन्य एका संशयित व्यक्तीचा हात होता. त्याला या कटाची माहिती होती.

२००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याच्याशी असलेल्या संबंधांबद्दल राणाची चौकशी केली जात असताना, त्याला दुबईतील या संशयित गूढ व्यक्तीबद्दलही 'एनआयए'कडून विचारले जात आहे. मुंबई हल्ल्यांपूर्वी राणा २००८ मध्ये दुबईला सपत्नीक गेला होता अन् तो तेथे एका व्यक्तीला भेटला.

या व्यक्तीला या हल्ल्याच्या कटाची माहिती होती. 'एनआयए'च्या कागदपत्रांनुसार त्या व्यक्तीने राणाला भारतात न जाण्याचा सल्ला दिला होता. कारण त्याला मुंबईवर होणाऱ्या हल्ल्याची माहिती होती. राणाकडे दुबईतील या अन्य सूत्रधाराविषयी चौकशी करण्यात येत असल्याचे 'एनआयए'च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेडलीनेच राणाला दुबईला जाऊन या व्यक्तीला भेटण्याची व्यवस्था केली होती, असे समजते. याआधी, हेडलीने राणाला नियोजित हल्ल्यामुळे भारतात न जाण्याचा इशारा दिला होता. त्याला दुबईतील या व्यक्तीने राणाला भेटल्यावर दुजोरा दिला होता. 'एनडीटीव्ही'ने 'एनआयए'च्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. याआधी, हेडलीने राणाला नियोजित हल्ल्यामुळे भारतात जाण्यापासून इशारा दिला होता, ज्याची पुष्टी दुबईतील या व्यक्तीने राणाला भेटल्यावर केली होती.

ही व्यक्ती कोण असू शकते, या तपास 'एनआयए' करत आहे. ती व्यक्ती पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'शी संबंधित असू शकते, पाकिस्तानी लष्करी अधिकारी किंवा पाकिस्तानस्थित दहशतवादी गटाचा नेताही असू शकते, असा 'एनआयए'ला संशय आहे. दुबईतील या गूढ व्यक्तीची ओळख प्रमुख दहशतवादविरोधी गुप्तचर यंत्रणेतही गुप्त ठेवल्याचे 'एनआयए'ने आपल्या अहवालात म्हटले आहे, ज्यामुळे 'एनआयए'च्या गोंधळातर भर पडली आहे.

२००६ मध्ये हेडली हल्ल्यांचे नियोजन करताना पाकिस्तानला गेला होता आणि लष्करे तय्यबाच्या नेत्यांना आणि हा कट रचणाऱ्या अन्य व्यक्तींना भेटला होता. राणा लवकरच त्याचे भारतातील संबंध, हेडलीने भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल आणि २००६ ते २००९ दरम्यानच्या भारत दौऱ्यांदरम्यान भेटलेल्या लोकांबद्दल तसेच त्या काळात भारतात प्रवास केलेल्या अन्य संशयितांबद्दल उपयोगी माहिती देऊ शकतो, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. राणा सध्या १८ दिवसांच्या कोठडीत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.