Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अक्षय कुमारने परेश रावल यांच्याविरोधात दाखल केला 25 कोटींचा खटला

अक्षय कुमारने परेश रावल यांच्याविरोधात दाखल केला 25 कोटींचा खटला

मुंबई : खरा पंचनामा

अभिनेता अक्षय कुमार याने दिग्गज अभिनेते परेश रावल यांच्याविरोधात 25 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3' सिनेमाच्या कास्टची चर्चा सुरु आहे.

अशात परेश रावल यांनी आधीच सांगितलं होतं की, ते आता 'हेरा फेरी 3' सिनेमाचा भाग नसतील. सिनेमातील काही गोष्टी त्यांना खटकल्यामुळे त्यांनी सिनेमात भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान एक हैराण करणारी माहिती देखील समोर आली आहे. अक्षय कुमारने त्याच्या प्रॉडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्सच्या माध्यमातून परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एवढंच नाही तर शूटिंग अर्ध्यावर सोडल्याबद्दल 25 कोटी रुपयांची मागणी देखील अक्षय याने परेश रावल यांच्याकडे केली आहे.

परेश रावलयांनी गेल्या आठवड्यात माध्यमांना सांगितलं होतं की, ते आता कल्ट कॉमेडी करणार नाही. परेश रावल यांनी 'हेरा फेरी 2' सिनेमा करण्यास नकार दिल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेची लाट पसरली आहे.

अक्षय कुमारच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने इंडस्ट्रीतील एखाद्या सहकलाकारावर अव्यावसायिक वर्तनाचा दावा दाखल केला आहे. परेश रावल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी हे नवीन नाही. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओह माय गॉड 2' सिनेमासाठी देखील परेश रावल यांनी नका दिला होता. 'ओह माय गॉड 2' सिनेमाची कथा आवडली नसल्यामुळे परेश रावल यांनी सिनेमा करण्यास नकार दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.