सुप्रीम कोर्टानं लाज काढल्यानंतर भाजप मंत्र्यांची तीन अधिकारी करणार कसून चौकशी
इंदोर : खरा पंचनामा
ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे. या प्रकरणाची चौकशी आता एसआयटी करणार आहे. चौकशीसाठी सोमवारी रात्री उशीरा तीन सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
सोमवारी सकाळी कोर्टानं विजय शाह यांना त्यांनी केलेल्या विधानावरुन चांगलेच झापलं होते. शाह यांनी केलेले कृत्य हे लाजीरवाणे असल्याचे सांगत शाह यांना कोर्टानं त्यांना खडसावले होते.
शाह यांच्या वकिलाने सांगितले की शाह यांनी माफी मागितली आहे. याबद्दल न्यायालयाने त्यांना फटकारले. न्यायालयाने म्हटले की, तुम्ही लोकांसमोर पूर्णपणे उघडे पडला आहात. शाह हे सार्वजनिक व्यक्ती आहात. बोलताना त्यांनी शब्दांचा विचार केला पाहिजे, असे सांगत याप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा केली होती.
एसआईटीमध्ये पोलिस महानिरीक्षक प्रमोद वर्मा, उपमहानिरीक्षक कल्याण चक्रवर्ती आणि पोलिस अधिक्षक वाहिनी सिंह यांचा समावेश आहे. कोर्टानं सोमवारी सकाळी मध्य प्रदेशाचे पोलिस महासंचालकांना मंगळवारपर्यंत सनदी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला होता.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाह यांच्याबाबत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजप नेता विजय शाह हे आमच्या पार्टीत असते तर आम्ही त्यांनी कायम स्वरुपी पक्षातून काढून टाकले असते, असे म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.