Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई पोलीस दलात 43 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या37 जणांची पदोन्नतीने बदली

मुंबई पोलीस दलात 43 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
37 जणांची पदोन्नतीने बदली

मुंबई : खरा पंचनामा

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या तब्बल 43 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या, तर 37 पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देऊन त्यांचीही बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत होते, अखेर या बदल्यांचे आदेश आज (17 मे) जारी करण्यात आले आहेत. दरम्यान बदली झालेल्या जागी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिले आहेत.

मुंबईतील 43 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात अविनाश काळदाते (घाटकोपर पोलीस ठाणे-नवी मुंबई), रणजीत आंधळे (सांताक्रुज पोलीस - ठाणे-मिरा-भाईंदर-वसई-विरार), मधुकर सानप (अकोला-विमानतळ पोलीस ठाणे), इरफान शेख (ठाणे गुन्हे शाखा), गबाजी चिमटे (चंद्रपूर-विलेपार्ले पोलीस ठाणे), गणेश पवार (ठाणे-एमएचबी पोलीस ठाणे), सदानंद माने (अकोला-संरक्षण व सुरक्षा), राजेंद्र काणे (रत्नागिरी-विशेष शाखा एक), उमेश मचिंदर (लातूर-अंधेरी पोलीस ठाणे), बळवंत देशमुख (ठाणे-घाटकोपर पोलीस ठाणे), जयश्री गजभिये (नागरी हक्क संरक्षण-वाहतूक), राजेश शिंदे (लोहमार्ग-ट्रॉम्बे पोलीस ठाणे), महेश बळवंतराव (एमएचबी पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), उदयसिंग सिंगाडे (मलबार हिल पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), रमेश भामे (अंधेरी पोलीस ठाणे-जोगेश्वरी पोलीस ठाणे), अजय कांबळे (नागपाडा पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), देवराज बोरसे (जोगेश्वरी पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस दल), सचिन गावडे (ताडदेव पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), गजानन विखे (गोराई पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), संदीप विश्वासराव (कफ परेड पोलीस ठाणे-गोरेगाव पोलीस ठाणे), सुधाकर धाने (अॅण्टॉप हिल पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), ज्योती भोपळे-बागुल (चारकोप पोलीस ठाणे-वाहतूक), जनार्दन परबकर (कुरार पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), अनिल पाटील (समतानगर पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस मरोळ), वैभव शिंगारे (सांताक्रुज पोलीस ठाणे-मुख्य नियंत्रण कक्ष), कविदास जांभळे (खैरवाडी पोलीस ठाणे गुन्हे शाखा), राजीव शेजवळ (वडाळा पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), मोहन पाटील (ओशिवरा पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), सदाशिव निकम (आंबोली पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), गंगाराम वाळवी (ट्रॉम्बे पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस नायगाव), राजेश गाठे (आरसीएफ पोलीस ठाणे-दक्षिण नियंत्रण कक्ष), दत्तात्रय खंडागळे (भांडुप पोलीस ठाणे-वाहतूक), सुदर्शन होनवडकर (विशेष शाखा एक-वडाळा पोलीस ठाणे), सतीश गायकवाड (संरक्षण व सुरक्षा-कफ परेड पोलीस ठाणे), अंजेलिना लोबो (सशस्त्र पोलीस मरोळ-नवघर पोलीस ठाणे), प्रमोद तावडे (वाहतूक-साकिनाका पोलीस ठाणे), संजीव तावडे (वाहतूक-कुरार पोलीस ठाणे), जयवंत शिंदे (आर्थिक गुन्हे शाखा-समतानगर पोलीस ठाणे), विनायक चव्हाण (गुन्हे शाखा-चारकोप पोलीस ठाणे), सुप्रिया मालशेट्टी (विशेष शाखा एक-खेरवाडी पोलीस ठाणे), रहिमतुल्ला सय्यद (सशस्त्र पोलीस नायगाव-शाहूनगर पोलीस ठाणे), महेश निवतकर (गुन्हे शाखा-गोराई पोलीस ठाणे), प्रतिभा मुळे (विशेष शाखा एक-येलोगेट पोलीस ठाणे).

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर आज 37 पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. या बढतीनंतर त्यांच्याही बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाळासाहेब राघोजी पवार (चेंबूर पोलीस ठाणे-भांडुप पोलीस ठाणे), सुरेश मदने (नवघर पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस नायगाव), रमेश ढसाळ (वाहतूक-वाहतूक), अनिल पाटील (चारकोप पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), शर्मिला सहस्त्रबुद्धे (गुन्हे शाखा गुन्हे शाखा), अनिल पाटील (मलबार हिल पोलीस ठाणे-मलबार हिल पोलीस ठाणे), प्रितम बाणावली (मालवणी पोलीस ठाणे-ओशिवरा पोलीस ठाणे), नंदराज पाटील (खार पोलीस ठाणे-गुन्हे शाखा), निलिमा कुलकर्णी (आझाद मैदान पोलीस ठाणे-ताडदेव पोलीस ठाणे), शैलेश अंचलवार (व्ही. पी. रोड पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस ताडदेव), सुनील कदम (कांजुरमार्ग पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), प्रभा राऊळ (संरक्षण व सुरक्षा-वाहतूक), अपर्णा जोशी (गुन्हे शाखा गुन्हे शाखा), संजय पाटील (सांताक्रुज पोलीस ठाणे-माहीम पोलीस ठाणे), गिरीधर गोरे (भोईवाडा पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस नायगाव), आशा कोरके (सशस्त्र पोलीस मरोळ-सशस्त्र पोलीस मरोळ), मधुलिका साळुंखे-पाटील (बीकेसी पोलीस ठाणे-वरळी पोलीस ठाणे), महादेव कुंभार (जुहू पोलीस ठाणे-आरसीएफ पोलीस ठाणे), केशवकुमार कासार (विकोळी पोलीस ठाणे-अॅण्टॉप हिल), योगेश शिंदे (पवई पोलीस ठाणे-सांताक्रुज पोलीस ठाणे), अमोल टमके (ताडदेव पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), सुवर्णा शिंदे (गुन्हे शाखा-गुन्हे शाखा), माधुरी पाटील (दादर पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), लता सुतार (गुन्हे शाखा गुन्हे शाखा), प्रमोद कोकाटे (मुलुंड पोलीस ठाणे-आंबोली पोलीस ठाणे), सिमाराम डुबल (समतानगर पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), अंजुम बागवान (आरसीएफ पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), सुहास चौधरी (वाहतूक-वाहतूक), अनघा सातवसे (नेहरुनगर पोलीस ठाणे-शिवाजीनगर पोलीस ठाणे), सुवर्णा आडसुळ (गुन्हे शाखा-गुन्हे शाखा), प्रसाद साटम (विशेष शाखा एक-विशेष शाखा दोन), प्रदीप काळे (बोरिवली पोलीस ठाणे-नागपाडा पोलीस ठाणे), ऋता नेमलेकर (गोवंडी पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), सीमा गुप्ता (विशेष शाखा एक-सशस्त्र पोलीस वरळी), मनीषा पाटील (आर्थिक गुन्हे शाखा-विशेष शाखा दोन), देवेंद्र पोळ (व्ही. बी. नगर पोलीस ठाणे-सहार पोलीस ठाणे).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.