Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लील फोटो व्हायरल केले विवाहित पोलिसाला अटक

तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लील फोटो व्हायरल केले 
विवाहित पोलिसाला अटक

नाशिक : खरा पंचनामा

एका पोलिसाने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पोलीस हा स्वतः विवाहित होता. तरीही त्याने तरूणीसोबत अनैतिक संबंध ठेवले. त्या तरूणीला घरी घेऊन जाण्यास नकार दिला. तिला जीवे मारण्याची धमकीही दिली, या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत शंकर दळवी असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकारानंतर नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दळवी याने त्या तरूणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दंगा नियंत्रण पथकातील पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. चंद्रकांत शंकर दळवी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. इंदिरानगर येथील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, विवाहित असतानाही तिच्याशी वैदिक पद्धतीने लग्नाचा बनाव रचत, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला घरी नेण्यास नकार देत फसवणूक केली. तसेच, तरुणीच्या पतीला गाडीखाली ठार मारण्याची धमकी देत तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दळवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दळवी याला शासकीय सेवेतून निलंबित केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.