Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाजकोल्हापूर साताऱ्यासह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज
कोल्हापूर साताऱ्यासह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुणे : खरा पंचनामा

मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची रिपरिप सुरु आहे. सोमवारपासून अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसह घाट माथ्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर कोकणातील काही ठिकाणी, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि घाट माथ्यावर विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, याठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.