पोक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पोलिसाकडे मागितली दीड कोटींची खंडणी
पुणे : खरा पंचनामा
तंटा मुक्तीचा केसचा निवाडा केल्यानंतर जवळीक साधून त्याने निवृत्त पोलीस अधिकार्याशी कौटुंबिक संबंध निर्माण केले. पत्नीला पुढे करुन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
दहावीचा निकाल लागल्याचे कारण पुढे करुन बक्षीस देण्यासाठी घरी बोलावून अल्पवयीन मुलीला लगट करण्यास लावले. त्यानंतर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन सेवानिवृत्त पोलिसांकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत ओतूर पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ६१ वर्षाच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ओतूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गावातील तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. गावातील जमिनीवरील अतिक्रमणाबद्दल तंटामुक्त समितीकडे अर्ज आला होता. हा वाद मिटविल्याने फिर्यादी व विजय फलके यांच्याशी ओळख झाली. त्याने फिर्यादी यांच्याशी मैत्री वाढविली. आपली पत्नी व मुलींना घेऊन त्यांच्याबरोबर बाहेर जेवायला घेऊन जात. एकत्र ड्रिंक करत असत. त्यांची पत्नी फिर्यादी यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत. अल्पवयीन मुलगी शॉर्ट कपडे घालून अंगप्रदर्शन करत. पुण्यात आमचा फ्लॅट आहे. तेथे आपण जाऊ, असे त्याच्या पत्नीने फिर्यादीला सांगितले होते. परंतु, संशय आल्याने ते चार हात लांब राहू लागले. १४ मे रोजी विजय याने फिर्यादी यांना सांगितले की, आई वडिल बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेले आहेत. मी लहान मुलीला घेऊन संगमनेरला जात आहे असे सांगितले. फिर्यादी हे तंटामुक्ती कामानिमित्त गावात गेले होते. तेव्हा त्याच्या मुलीचा फोन आला. तिने मला दहावीत ९२ टक्के मार्क मिळाले. तुम्ही मला काहीच भेट दिलेली नाही. तुम्ही मला गिफ्ट घेऊन या, असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी हे पुष्पगुच्छ घेऊन घरी गेले. त्यावेळी या मुलीने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने फिर्यादी हे तातडीने तेथून निघून घरी आले. पाठोपाठ विजय याने त्यांना करुन साहेब तुम्ही माझ्या मुलीसोबत असे का केले, असे म्हणून त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली. त्यांना एका हॉटेलवर बोलावून घेण्यास आले. फिर्यादी यांनी माहिती काढली, तेव्हा विजय याने अशाच प्रकारे आणखी एकाला जाळ्यात अडकवले होते. आळे फाटा येथे गुन्हा दाखल करुन ५ कोटी रुपये घेतल्याची माहिती समजली आहे, असे फिर्यादी यांनी विजय याला सांगितले. तेव्हा त्याने आरडाओरडा केला. त्याच्या वतीने फिर्यादी यांच्याशी दुसरा माणूस बोलू लागला. तुमच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल होईल, तुम्हाला जामीन मिळणार नाही, असे सांगून दोन कोटी रुपयांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी इज्जतीला घाबरुन दीड कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यांच्याकडून त्यांनी जबरदस्तीने चेक घेतले. फिर्यादी यांनी आपल्याला होत असलेल्या ब्लॅकमेलिंग बाबत मित्राला सांगितले. त्यांनी चौकशी केल्यावर विजय याने अशा प्रकारे बर्याच लोकांना फसवणूक पैसे उकळल्याचे समजले आहे.
याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांनी सांगितले की, विजय याने अशा प्रकारचा गुन्हा आळे फाटा येथे दाखल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.