Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 7 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ताचे सह आयुक्त

राज्यातील 7 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ताचे सह आयुक्त

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 7 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने मंगळवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.

बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कुठे : 
रविंद्र शिसवे : पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
निकम शारदा वसंत : सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स.
निस्सार तांबोळी : पोलीस सह आयुक्त, नागपूर शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल, नागपूर
एन.डी. रेड्डी : पोलीस आयुक्त, अमरावती ते पोलीस सह आयुक्त नागपूर शहर
सुप्रिया पाटील-यादव : पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन हजर) ते विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
राजीव जैन : विशेष पोलीस महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
अभिषेक त्रिमुखे : अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.