Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस कर्मचाऱ्याची कमाल, लाचसुद्धा घेतली ऑनलाईन!

पोलीस कर्मचाऱ्याची कमाल, लाचसुद्धा घेतली ऑनलाईन!

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आता खिशात पैसे ठेवण्याऐवजी कुठेही ऑनलाईन पैसे ट्रन्सफर करण्यात येतात. मात्र, लाच कधी ऑनलाईन घेतली जाईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळणार आहे. परंतु पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लाच घेण्याचा प्रताप केला आहे. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तो अडकला. छत्रपती संभाजीनगरमधील सहायक फौजदारास अटक करण्यात आली आहे.

बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी वाहतुकीसाठी एका 30 वर्षीय ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक विभागाचा सहायक फौजदार अशोक वाघ याने ही लाच मागितली. ठेकेदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर संभाजीनगरमधील हर्सल टी पॉइंटवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अशोक वाघ यांना अटक केली. अशोक वाघ याने एक हजारांची लाच मागून चक्क ती 'फोन-पे'ने स्वीकारली. सेवानिवृत्तीस अवघे दीड वर्ष असताना त्यांनी ऑनलाईन लाच घेण्याचे धाडस केले.

30 वर्षीय तक्रारदाराचा बांधकामासाठी खडी, कच, वाळू पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील स्वतः ट्रॅक्टरद्वारे या साहित्याचा पुरवठा करतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून सातत्याने अडवणूक करून पैशांची मागणी केली जात होती. त्याला कंटाळून त्या तरुणाने तक्रार केली.

एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे ठेकेदाराने तक्रार केली. आटोळे यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी तक्रारीची खातरजमा केली. तेव्हा वाघ याने तक्रारदाराला शनिवारी सायंकाळी हसूल परिसरात पैसे घेऊन बोलावले. निरीक्षक अमोल धस यांनी अंमलदार युवराज हिवाळे, राजेंद्र नंदीले, चांगदेव बागुल यांच्यासह तेथेच सापळा रचला. तक्रारदाराने वाघची भेट घेतली. तेव्हा त्याने तत्काळ 'फोन पे' वरच ऑनलाइन एक हजार रुपये पाठवण्यास सांगितले. लाच स्वीकारताच धस यांनी धाव घेत वाघ याला ताब्यात घेत मोबाइल जप्त केला. त्याला अटक करून हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.