Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस ठाण्यातच धरली अधिकाऱ्याची कॉलर, केली शिवीगाळ

पोलीस ठाण्यातच धरली अधिकाऱ्याची कॉलर, केली शिवीगाळ

पायधुणी : खरा पंचनामा

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शेख नावाच्या गुन्हेगारांनी पायधुणी पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला आहे. या सराईत गुन्हेगारांनी पोलीस अधिकारी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करून पळ काढल्याची घटना दक्षिण मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात घडली. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. ही घटना पोलीस ठाण्यात घडल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे, अजीजुल सिराजुल शेख, नूरअली मेहरअली शेख आणि सैफुद्दीन शाहिद शेख अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांनाही फरार घोषित केले आहे. तसेच त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पायधुनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पायधुनी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले उपनिरीक्षक आणि वरळी पोलीस कॉलनीतील रहिवासी इरफान मन्सूर सय्यद बुधवारी रात्रीच्या ड्युटीवर होते. रात्री १०:४५ वाजता त्यांना पायधुनी पोलीस ठाण्यासमोर तिघेजण मोठ्याने आरडाओरडा करीत असल्याचे दिसले. पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांनी त्यांना शांत होण्यास सांगितले असता, तिघांनीही वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिघांनीही पोलीस अधिकारी सय्यद यांना त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "आम्हाला काय करायचे ते सांगणारे तुम्ही कोण? आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील." अशी धमकी देऊन या तिघांनी अधिकाऱ्याला मारहाण केली, त्याच्या उजव्या हातावर मारले, त्याची मान धरली आणि धमक्या देत होते. यामध्ये एका आरोपीने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आणि "बघा पोलिस कसे पळून जातात" असे म्हणत पोलिसांना नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यांनी त्याचे हातपाय तोडण्याची धमकी दिली आणि बघून घेण्याचे धमकी दिली.

पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवरही कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करणे, धमक्या देणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या पुढील अधिक तपास सुरू आहे पोलीस पथके फरार आरोपींचा सक्रियपणे शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.