Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रकचालकाला अडवून वाटमारी करणारा पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

ट्रकचालकाला अडवून वाटमारी करणारा पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे : खरा पंचनामा

मोबाईलवर बोलत ट्रक चालवत असल्याचा आरोप करुन १५ हजार रुपये दंडाची भिती दाखवून १० हजार रुपये घेऊन वाटमारी करणाऱ्या सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित केले आहे.

बापूराव पोपट ढोले असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांनी पाठविलेल्या अहवालावरुन पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलीस अंमलदार ढोले याने १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर बोगदा पास करुन पुढे सातारा बाजूला जाताना कारमधून जाऊन एका ट्रकला अडविले. ट्रकचालक राहुल कुमार शिवनाथ यादव (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना 'आप फोन पे बात कर रहे है, उसका चलान १५ हजार रुपये है,' असे म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांना स्वतःच्या गाडीत बसवले. त्यांनी माझ्याकडे ऐवढे पेसे नाहीत, बँक खात्यात १० हजार रुपये आहेत, असे सांगितले. तेव्हा तो ट्रकचालकाला खेड शिवापूर येथील एका पेट्रोल पंपावर गेला. तेथील कर्मचार्याला ऑनलाइन पैसे मारण्यास सांगितले. परंतु, या कर्मचार्याने रोख पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तो ट्रकचालकाला एका गॉगल स्टॉलच्या दुकानात घेऊन गेला. तेथील दुकानदाराला ऑनलाईन पैसे देऊन त्याच्याकडून १० हजार रुपये घेतले. ट्रकचालक राहुल यादव यांनी तक्रार केली. त्याची चौकशी करण्यासाठी ढोले याच्याशी संपर्क साधला गेला. त्यावेळी त्याने ट्रकचालकाची माफी मागून १० हजार रुपये ट्रकचालकाला परत केले.

याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी रिपोर्ट पाठविला. पोलीस दलाच्या कर्तव्याशी प्रतारणा करणारे अत्यंत गलिच्छ व भष्ट्राचारास पोषण देणारे कृत्य केल्याने पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ढोले याला निलंबित केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.