आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
मुंबई : खरा पंचनामा
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यातील राष्ट्रीय सेवा योजना NSS पदाधिकाऱ्यांसोबत आज ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सहभाग घेतला होता.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास युवकांद्वारे रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी 'MY भारत' पोर्टलवर (https://mybharat.gov.in/pages/civil_registration) सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी, असे आवाहन पाटील यांनी या बैठकीदरम्यान केले.
यावेळी राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.