मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे उद्दिष्टपूर्तीबद्दल केले अभिनंदन
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत धोरणात्मक निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व विभागांना उद्दिष्टे दिली होती. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शंभर दिवसांत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करून मोठे यश मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे १०० टक्के उद्दिष्टपूर्तीबद्दल अभिनंदन केले.
आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाचा मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांचे १०० टक्के उद्दिष्टपूर्तीबद्दल अभिनंदन केले. तसेच, 'सर्वोत्तम आयुक्त/संचालक' म्हणून निवड झालेले तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा देण्यात आला होता. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने १०० दिवसांत उत्तम कामगिरी केली असून निर्धारित केलेली ११ लक्ष्य पूर्ण केली आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांची सर्वोत्तम संचालक म्हणून निवडसुद्धा झाली आहे. शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवून महत्त्वपूर्ण नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी केली आहे. गेल्या 100 दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निश्चित केलेली ११ धोरणात्मक उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.या कामगिरीत विभागाने राज्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.