लग्नाच्या आमिषाने मुंबईतील योगा शिक्षिकेवर बलात्कार
माधवनगर येथील व्याप्याऱ्याला अटक
सांगली : खरा पंचनामा
सोशल मीडियावरून ओळख वाढवून लग्नाच्या आमिषाने मुंबई येथील योगा शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी माधवनगर (ता. मिरज) येथील व्यापाऱ्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मुकेश मनोहर नरसिंगानी (वय ३९) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मुंबई परिसरातील ३९ वर्षीय घटस्फोटीत महिला योग शिक्षक आहे. तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. योगाच्या रिल्स पाहून सप्टेंबर २०२३ मध्ये मुकेशने त्या शिक्षिकेला मेसेज केले. त्यातून त्यांची ओळख वाढली. नंतर मुकेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून सांगलीसह, मीरा रोड भाईंदर परिसरातील लॉजवर त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले.
मुकेशने लग्न न करता फसवणूक केल्या बद्दल त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पिडिता काल सांगलीत आली. शहर पोलिसांनी मुकेश याला तातडीने अटक केली. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. पोलिस उपनिरीक्षक सागर होळकर तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.