पुण्यातील तरूणीला पाकचा पुळका, इन्स्टाग्रामवर 'पाकिस्तान झिंदाबाद' लिहील्याने गदारोळ, थेट अटक
पुणे : खरा पंचनामा
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले.
मात्र यामुळे बिथरलेल्या पाकने भारतवरच प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सर्व हल्ले रोखत पाकला धडा शिकवला. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकमधील तणाव वाढला आहे.
मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एका तरूणीने पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील पुणा येथील कोंढवा भागात राहणाऱ्या एका तरूणीने इन्स्टाग्रामवर 'पाकिस्तान झिंदाबाद' लिहील्याचा आरोप असून त्या तरूणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरूणी पुण्यातील एका कॉलेजध्ये शिकते आणि कोंढला येथील कौसरभाग भागात राहते.
पोलिस कॉन्स्टेबल सुभाष जरांडे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (9 मे) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी मुलीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे या प्रकरणाची पुष्टी करत पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले.
भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईनतर सोशल मीडियावर पोलीस सतत लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान या आरोपी तरूणीची एक आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर समोर आली, ज्यामध्ये शेवटी 'पाकिस्तान झिंदाबाद' लिहिले होते.
पोलिसांनी मुलीवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली आरोप लावले आहेत, ज्यात कलम 152 (भारताची अखंडता धोक्यात आणणे), कलम 196 (समूहांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), 197 (राष्ट्रीय एकात्मतेविरुद्ध टिप्पण्या), 299 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेली कृत्ये), 352 (जाणूनबुजून अपमान) आणि 353 (सार्वजनिक अशांतता निर्माण करणारी विधाने) यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.