आठ राज्यांमधील 37 विमानतळ बंद
नवी दिल्ली : खरा पंचनामा
भारत-पाकिस्तान तणावानंतर आठ राज्यांमधील 37 विमानतळ उद्या (शनिवार) पर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा समावेश आहे गुरुवारी दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द करण्यात आली.
पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नागरी विमान वाहतूक विभागाने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. आता प्रवाशांना दुहेरी सुरक्षा तपासणीतून जावे लागणार आहे. यासाठी एअर इंडिया, अकासा, स्पाईसजेट आणि इंडिगो एअरलाइन्सनेही विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्यास सांगितले आहे. श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या सीमावर्ती जिल्ह्यांत शाळा बंद ठेवल्या आहेत. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट आहे. सीमावर्ती भागात सुरक्षा दलांची तैनाती.
जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ, राजौरी, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यातील सर्व शाळा बंद. श्रीनगर विमानतळ आणि अवंतीपोरा हवाई तळाजवळील शाळाही बंद.
लेह जिल्ह्यात ड्रोन आणि यूएव्हीच्या उड्डाणांवर बंदी. ऑल लडाख हॉटेल अँड गेस्ट हाऊस असोसिएशनकडून पर्यटकांसाठी मोफत निवास व्यवस्था.
एअर इंडियाने शनिवारी (दि. 10 मे) सकाळी 5.29 वाजेपर्यंत 9 शहरांना जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली. यामध्ये जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटचा समावेश आहे.
दिल्ली विमानतळाच्या माहितीनुसार, विमानतळावरील कामकाज सामान्य आहे. पण हवाई क्षेत्र आणि सुरक्षेच्या कारणांमुळे काही उड्डाणांना फटका बसला आहे. प्रवाशांना एअर लाईन्सकडून त्यांच्या फ्लाईटची माहिती मिळाल्यानंतरच विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.
इंडिगोने शनिवारी सकाळी 5.29 वाजेपर्यंत 11 शहरांची उड्डाणे रद्द केली. यामध्ये जम्मू, श्रीनगर, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, किशनगड आणि राजकोटचा समावेश.
शनिवारपर्यंत 165 इंडिगो उड्डाणे रद्द. ही कंपनी रोज सुमारे 2200 उड्डाणे चालवते.
दिल्ली विमानतळावर विविध कंपन्यांची 20 उड्डाणे रद्द.
इंडिगोकडून 14 जूनपर्यंत अल्माटी आणि ताश्कंदला जाणारी थेट उड्डाणे स्थगित.
एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसकडून सुरक्षा दलांशी संबंधित लोकांना तिकीट रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळणार.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.