Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाकिस्तानी मुलीसोबत केलाला विवाह लपवला; व्हिसा संपूनही घरात ठेवलंकेंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबलवर मोठी कारवाई

पाकिस्तानी मुलीसोबत केलाला विवाह लपवला; व्हिसा संपूनही घरात ठेवलं
केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबलवर मोठी कारवाई

दिल्ली : खरा पंचनामा

भारतीय केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मुनीर अहमद यांनी पाकिस्तानी मुलीसोबत विवाह केला होता. मात्र याबाबत मुनीर अहमद यांनी पाकिस्तानी महिलेसोबत विवाह केल्याची माहिती देखील लपवली होती. त्यामुळे मुनीर अहमद यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

औपचारिक मान्यता नसतानाही मुनीर अहमदने पाकिस्तानी मुलीसोबत विवाह केला. त्यांनी मुनीर अहमदविरुद्ध बडतर्फची कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सीआरपीएफ जवान मुनीर अहमदचा अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिक मीनल खानशी विवाह झाला होता. त्यानंतर ती व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि नंतर तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. पण तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 रोजी संपली होती आणि तरीही ती भारतात राहत होती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत घेण्यात आली होती. ज्या दिवशी ती अटारी-वाघा सीमेवर होती त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात तिच्या याचिकेवर सुनावणी पार पाडली. कोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतर तिला सीमेवरून परत पाठवण्यात आले होते.

पाकिस्तानी महिलेसोबतच्या लग्नाची वस्तुस्थिती लपवल्याबद्दल सीआरपीएफने जवान मुनीर अहमद यांना बडतर्फ केले आहे. मुनीरच्या कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानी नागरिकाशी लग्न लपवल्याबद्दल आणि व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला जाणूनबुजून आश्रय दिल्याबद्दल तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची पुष्टी देखील सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.