आमदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले; २० लाख रुपये घेतल्याचा आरोप
जयपूर : खरा पंचनामा
राजस्थानच्या बागीदौरा येथील एका आमदाराला लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. विधानसभेत खाणकाम संदर्भातील प्रश्न हटवण्याच्या बदल्यात आमदाराने तब्बल १० कोटींची मागणी केली होती.
या प्रकरणात २० लाख रुपये स्वीकारताना आमदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. जयकृष्ण पटेल असे भारतीय आदिवासी पार्टीच्या आमदाराचे नाव आहे.
जयकृष्ण पटेल यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते एका कंपनीला गेल्या काही काळापासून काम न करण्याबाबत त्रास देत होते. त्यांनी तडजोड करत कंपनीकडून अडीच कोटी रुपये मागितले होते. त्यानंतर 4 एप्रिल रोजी तक्रारदार रविंद्र सिंग यांनी ACB मध्ये तक्रार नोंदवली होती.
तडजोडीनंतर पहिला हफ्ता आमदाराला एक लाख रुपये रोख देण्यात आला. त्यानंतर एसीबीने सापळा रचून पुरावे गोळा केले. पुढचा हफ्ता २० लाख रुपयांचा जयपूरमध्ये आमदाराच्या निवासस्थानीच दिला जाणार होता. त्यादिवशी आमदार स्वतः जयपूरला पोहोचले आणि नोटांनी भरलेली बॅग घेतली. त्यावर त्यांच्या बोटांचे ठसेही आढळून आले आहेत. आमदाराने लाच घेतल्याचे तांत्रिक पुरावेही एसीबीने सादर केले.
तसंच दावा केला की नोटांवर विशेष शाई लावली होती. ऑडिओ, व्हिडीओ आणि फोटोही पुरावे म्हणून आमच्याकडे आहेत. बॅग उचलताना आमदाराच्या बोटांचे ठसे त्यावर असल्याचंही एसीबीने सांगितलं. दरम्यान, आमदाराच्या वतीने पैसे घेणारा व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला आहे. मात्र त्या व्यक्तीचं पैसे घेऊन जातानाचा रेकॉर्डिंग असल्याचा दावा एसीबीने केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.