Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत गुंगीकारक ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार अवघ्या काही तासात विश्रामबाग पोलिसांनी केली सोलापूर, पुणे, सांगलीतील तिघांना अटक

सांगलीत गुंगीकारक ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार 
अवघ्या काही तासात विश्रामबाग पोलिसांनी केली सोलापूर, पुणे, सांगलीतील तिघांना अटक 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाली करत तीन तरुणांना अटक केली आहे. यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे.

विनय विश्वेष पाटील (यय २२, रा. महीपती निवास अंतरोळीकर नगर भाग १ सोलापुर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (वय२०, रा. एफ ६०५, सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे), तन्मय सुकुमार पेडणेकर (वय २१, रा. ३०३ कासाली व्हिया अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित तरुणी आणि संशयित पाटील, गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत. पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात  शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला मुव्ही पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेले.

तेथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजले तसेच तेही दारू प्यायले. त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक केली.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.