Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करारमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको  व्हीलेज, पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार
मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : खरा पंचनामा

मंत्रालयात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको  व्हीलेज, पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर ही संस्था भारतीय ज्ञान प्रणाली आणि नेतृत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. अशा उपक्रमांमुळे अध्यापकांचे ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन अधिक सुदृढ होईल.भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र भारुड, व्यवस्थापक (प्रशासन) शंतनु पवार, केंद्र प्रमुख मिथीलेश भाकरे, कार्यकारी सहायक सलीम सय्यद , श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर संस्थेचे नवल जीत कपूर, अनुप गोयल, संजय भोसले उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.