Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी; महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी; महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय

मुंबई : खरा पंचनामा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करत अकरावी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक आणि एकसंध असावी, यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे या निर्णयानुसार, संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालये सरकारने निर्धारित केलेल्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरच प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात आली असून, चार फेऱ्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या चार फेऱ्यांनंतर 'सर्वांसाठी खुला प्रवेश' (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, उर्वरित रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे. प्रवेश अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक माहितीपत्रक, गुणपत्रक व प्राधान्यक्रमानुसार निवडलेली महाविद्यालयांची यादी ऑनलाइन प्रणालीत भरावी लागेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.