Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाजनांच्या बदनामीचे व्हिडीओ काढून टाकाउच्च न्यायालयाचे युट्यूबर अनिल थत्तेंना आदेश

महाजनांच्या बदनामीचे व्हिडीओ काढून टाका
उच्च न्यायालयाचे युट्यूबर अनिल थत्तेंना आदेश

मुंबई : खरा पंचनामा

काही दिवसांपूर्वी युट्यूबर अनिल थत्ते यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

गिरीश महाजन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने अनिल थत्ते यांना गिरीश महाजन यांच्या बाबतीत बिनबुडाचे आणि बदनामीकारक अपलोड केलेले सर्व व्हिडीओ सोशल मीडियावरून तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

अनिल थत्ते यांनी एका व्हिडीओमध्ये गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकार्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांनी अनिल थत्ते यांचे व्हिडीओ असत्य आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले होते.

तसेच अनिल थत्ते यांनी या आरोपांचे ठोस पुरावे द्या, अशी मागणी करत गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. कायदेशीर नोटीस पाठवून देखील अनिल थत्ते आपले म्हणणे मांडण्याकरीता न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे अनिल थत्ते यांना उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील मिळाला नाही. तसेच त्यांना व्हिडीओ बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांनी देखील त्यांच्या बाजूने उभे राहिले नाहीत, अशी चर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यामध्ये सुरू आहे.

दरम्यान न्यायालयाला हे व्हिडीओ दाखवण्यात आले, उच्च न्यायालयाने अनिल थत्ते यांनी केलेल्या बदनामीकारक विधानांचा भाग अधोरेखित केला. व्हिडीओ व ट्रान्सक्रिप्टवरून अनिल थत्ते यांनी पूर्णपणे खोटे, बिनबुडाचे, आक्षेपार्ह व बदनामीकारक विधाने केली असल्याचे गिरीश महाजन यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर, अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्याबाबतीत केलेले आरोप हे द्वेषमूलक, खोटे, त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेस हानी पोहचविणारे व बदनामीकारक आहेत. कसलाही आधार नसताना असे व्हिडीओ प्रकाशित करणे, प्रथमदर्शनी कारवाई करण्यास योग्य आहे, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. सोबतच अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या बाबतीत विविध सोशल मीडियावर अपलोड केलेले बदनामीकारक, मानहानीकारक सर्व 6 व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.