सांगलीत भरदिवसा ४० तोळे सोन्याची बॅग धूम स्टाईलने लंपास
सांगली : खरा पंचनामा
शहरातील गजबजलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या
वृद्धाच्या हातातील 40 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यानी धूम स्टाईलने लंपास केली. शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
धनचंद्र भाऊराव सकळे (वय ६५, रा. क्रांती क्लिनिकजवळ, सांगली) हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत. कर्मवीर पतसंस्थेत त्यांनी दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर घेतला आहे. चार दिवसापूर्वी लग्नकार्यामुळे त्यांनी दागिने घरात आणले होते. त्यानंतर दागिने परत पतसंस्थेत ठेवण्यासाठी चालकाला घेऊन ते शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मोटारीतून बाहेर पडले. कर्मवीर पतसंस्थेच्या दारात चालकाने मोटार थांबविली.
मोटारीचा दरवाजा उघडून सकळे खाली उतरले. तेवढ्यात मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील बॅग हिसकावली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो दुचाकीवरुन चौकातून शंभरफुटी रस्त्याकडे वेगाने निघून गेला. सकळे यांना क्षणभर काही समजले नाही. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावले. भरदिवसा ४० तोळ्याची बॅग लंपास केल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला.
त्यानंतर उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली. पतसंस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासणी केली. तेव्हा एकट्याच चोरट्याने मोटारीच्या मागून येऊन बॅग लंपास केल्याचे दिसून आले. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.