Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शाहिद आफ्रिदी याला पाकिस्तानमध्ये पळवून पळवून तुडवला?

शाहिद आफ्रिदी याला पाकिस्तानमध्ये पळवून पळवून तुडवला?

मुंबई : खरा पंचनामा

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याला अकलेचे तारे तोडण्याची सवयच झालीय. आफ्रिदीने आतापर्यंत अनेकदा अकलेचे प्रदर्शन केलंय. त्यामुळेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कायमच आफ्रिदीची फिरकी घेतली जाते.
शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन भारतावर गंभीर आरोप केले होते. आफ्रिदीच्या या आरोपांवरुन टीम इंडियाची माजी क्रिकेट शिखर धवन याने आफ्रिदीची लायकी काढली. त्यानंतर आता सोशल मीडियावर आफ्रिदीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडिओत पाकिस्तानमधील लोकं आफ्रिदीची धुलाई करत आहे.

आफ्रिदीची धुलाई करत असल्याचा व्हीडिओ हा शिखर धवन या फेक अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हीडिओत आफ्रिदीने त्याच्या चाहत्याला कानशिलात लगावली होती. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी आफ्रिदीला चांगलाच तुडवला होता. पाकिस्तानमधील लोकांनी आफ्रिदीला पळवून पळवून हाणला होता. आफ्रिदी तिथून कसा तरी निघून गेला. मात्र काही लोकांनी त्याला मागून फटकावला.

शाहिदी आफ्रिदी याला चोप देतानाचा व्हायरल झालेला व्हीडिओ हा 23 मार्च 2012 रोजीचा असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा पाकिस्तान पराभूत होऊन मायदेशी परतली होती. तेव्हा चाहत्यांनी आफ्रिदीला विमानतळावर घेरलं होतं. तेव्हा एकाने केलेल्या कमेंटमुळे आफ्रिदी भडकला. संतापलेल्या आफ्रिदीने त्या चाहत्याला कानशिलात लगावली. त्यानंतर आफ्रिदीचे चाहते क्रिकेटवर तुटून पडले आणि त्याला लाथाबुक्क्यांचा जोरदार प्रसाद दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.