Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सेम टू सेम कॉपी करण्याचा धंदा सुरुच!

सेम टू सेम कॉपी करण्याचा धंदा सुरुच!

दिल्ली : खरा पंचनामा

पहलगाममधील पर्यटकांवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. भारताने रणनीतीवर चर्चा सुरु असतानाच पाकिस्तानकडून युद्धाची दर्पोक्ती सुरुच आहे.

मंत्र्यांकडूनही आगीत तेल ओतणारी वक्तव्ये सुरु आहे. या सर्व वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता भारताचीच सेम टू सेम कॉपी करताना आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 29 एप्रिल रोजी करण्यात आली होती. परंतु, 30 एप्रिल रोजी मध्यरात्री माध्यमांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली. सप्टेंबर 2024 मध्ये असीम मलिक यांना आयएसआय प्रमुख बनवण्यात आले होते.

एप्रिल मध्ये मोईद युसूफ यांच्यानंतर पाकिस्तानमध्ये एनएसए नियुक्ती करण्यात आली नव्हती. या नियुक्तीनंतर, असीम मलिक यांच्याकडे आता दोन जबाबदाऱ्या (आयएसआय प्रमुख आणि एनएसए) असतील. यापूर्वी 30 एप्रिल रोजी, भारत सरकारने एनएसए बोर्ड (एनएसएबी) ची पुनर्रचना केली आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.