नाराजीचा कार्यक्रम?
अजित पवारांनी वेळेआधीच केले उद्धघाटन; मेधा कुलकर्णीच्या नाराजीनंतर पुन्हा केले उद्घाटन!
पुणे : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील काही कायक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यासाठी अगोदर जी वेळ ठरवण्यात आली होती त्या वेळेच्या अगोदरच त्यांनी हे कार्यक्रम उरकले असल्याने आज सकाळी पुण्यात राजकीय मंडळींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
त्याच झालं असं उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या सकाळी लवकरच कामाला लागण्याच्या सवयीमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यात आज सकाळी देखील त्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी 6.30 वाजण्याच्या आधीच कामाला सुरूवात केली. ज्या ठिकाणी कामाला सुरुवात केली त्याची नियोजित वेळ ती नव्हती. मात्र या वेळेआधीच अजित पवारांनी कार्यक्रमांना आणि त्यांच्या कामांना सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्याठिकाणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं होतं. वेळेच्या आधीच अजित पवार यांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यामुळे मेधा कुलकर्णी यांची थोडी चिडचिड झाल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले.
नाराज असल्याच्या चर्चावर स्पष्टीकरण देताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या," मी वेळेच्या १० मिनिट अगोदर त्याठिकाणी पोहचले होते पण त्याच्याही अगोदर इमारतीचे उदघाटन झाल्याचे मला समजले त्यामुळे मला नक्कीच वाटलं. जी वेळे घोषित केलेली असते त्यावेळी आम्ही तिथे हजर असतो आणि त्याच्या अगोदर जर उदघाटन होणार असले तर पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात काही अर्थ राहत नाही. मागेपण त्यांनी एकदा शिवाजी नगरच्या कार्यक्रमाचे उदघाट्न सकाळी सकाळी उरकून टाकले होते. अजित दादा हे आमचे सगळ्यांचे दादा आहेत माझी त्यांना एक विनंती आहे त्यांनी एक वेळ निश्चित करा रात्रीची सकाळची कधीही आम्ही त्या वेळेत तिथे हजर राहू. जर आम्हाला उशीर झाला तर तुम्ही थांबू नका." ते त्यांनी म्हटले.
नियोजित वेळेपूर्वीच अजित पवार यांनी विभागीय आयुक्तालय येथील महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं. सकाळी 6.30 वाजण्याच्या आसपास पुण्यातील विभागीय आयुक्तालयात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचे उद्घाटन केले. त्यानंतर सकाळी 7.10 वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित सिंहगड रोड वरील उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले. सकाळी 8 वाजता राज्याच्या 66 व्या स्थापना दिवसानिमित्त पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.