Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांच्या शहराध्यक्षाने पुणे पोलिसांना गंडवलं ! आर्थिक व्यवहार लपवण्याचा प्रयत्न; अटकेची टांगती तलवार !

अजित पवारांच्या शहराध्यक्षाने पुणे पोलिसांना गंडवलं ! 
आर्थिक व्यवहार लपवण्याचा प्रयत्न; अटकेची टांगती तलवार !

पुणे : खरा पंचनामा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे.

पोलिसांना बनावट कागदपत्र सादर करून दिशाभूल केले असल्याचा ठपका मानकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडे याला पुणे पोलीसांनी परदेशी महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करताना अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. तसेच कुकडे याचे अनेकांसोबतचे आर्थिक हितसंबंध देखील समोर आला होता. या तपासामध्ये कुकडे याने आपल्या बँक खात्यातून दीपक मानकर यांच्या खात्यामध्ये तब्बल एक कोटी रूपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.

पोलिस तपासात शंतनू कुकडेचा निकटवर्तीय सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे दिपक मानकर यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावले असता त्यांनी शंतनू कुकडे याच्या सोबत आपले कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचे सांगत काही कागदपत्रे सादर केली होती.

पोलिसांकडून या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीमध्ये मानकर यांनी पोलिसांना सुपूर्द केलेली कागदपत्र चुकीची (बनावट) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.