"मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण."
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवत राजकीय वर्तुळात चर्चांना नवे वलय दिलं आहे. "मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय? कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही," असं वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेचा पुनः एकदा उल्लेख केला.
१ मे ते ४ मेदरम्यान मुंबईच्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात अजित पवार हे सहभागी झाले होते. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित या महोत्सवात २ मे रोजी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी "महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी" असं मत व्यक्त केलं. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं पण शेवटी मात्र योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय? कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही."
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षेवर चर्चा रंगू लागली आहे. हे वक्तव्य केवळ मनातील भावना आहे की राजकीय संकेत - हे पाहणं देखील तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.