"गरज नसेल तर खाते बंद करा !"
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अंतर्गत असलेल्या आदिवासी विभागाचा निधी अर्थ खात्याने पुन्हा वळवला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा जीआर निघाला तरी याची माहिती संजय शिरसाट यांना नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव यांनी या संदर्भात एक्स वर पोस्ट करत आदिवासींच्या वाट्याचे पैसे वळवल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर संतापलेल्या संजय शिरसाट यांनी माझे खाते महत्त्वाचे वाटत नसले तर बंद करा, अशा शब्दात अर्थ खात्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
फायानान्स डिपार्टमंटवाले जास्तीचं डोकं चालवतात, असा टोलाही संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले, अशी पोस्ट अंबादास दानवे यांनी केली. सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे, असे म्हणत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रुपये.
तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले ! अशा प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले, याकडे अंबादास दानवे यांनी लक्ष वेधले. तर नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही, हे ही अंबादास दानवे यांनी अधोरेखित केले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांच्या या दाव्यावर संजय शिरसाट यांना जेव्हा विचारले, तेव्हा ते चांगले भडकले. जवळपास सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आले आहेत, याची मला कल्पना आणि माहिती नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केले तरी चालेल. मला याची काहीच कल्पना नाही, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. फायनान्स डिपार्टमेंट आपली मनमानी करत आहे. आपण म्हणू तेच खरं म्हणत आहेत.
या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही, पण फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झालं आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? हे मला पटलेलं नाही. माझे मागच्या वर्षीचे दायित्व 1500 कोटी रुपयांचे आहे. इतर खात्याचे वर्ग झाले की काय माहिती नाही. मात्र, सामाजिक खात्याचे पैसे वर्ग झाले हे सत्य असल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.