Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला अटक

दिल्ली : खरा पंचनामा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी राजस्थानातून आली आहे. जैसलमेर पोलिसांनी एक सरकार कर्मचारी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा माजी पीएला अटक केली आहे. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय साठी काम करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर राज्य रोजगार विभागाचा कर्मचारी शकूर खान मंगालियारला जैसलमेरमध्ये सीआयडी आणि गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त पथकाने अटक केली. आता त्याच्या संशियत हालचालींची माहिती घेतली जात आहे. मंगालियारच्या मोबाइलमध्ये काही पाकिस्तानी फोन नंबर आढळून आले आहेत. इतकेच नाही तर या शकूर खान मंगालियारने पाकिस्तानचे दौरेही केले होते, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

मागील काही वर्षात मंगालियारने सात वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता. ही गोष्ट त्याने मान्य केली आहे. त्यामुळे काळजीत वाढ झाली आहे. एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले की उच्च मुख्यालायकडून संशयित घडामोडींसंदर्भात अलर्ट मिळाला होता. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. आता आम्ही सर्व तथ्यांचे सत्यापन करत आहोत. मंगालियारच्या फोनमध्ये सैन्यासंदर्भात फोटो किंवा व्हिडिओ आढळलेले नाहीत. परंतु, अनेक फाइल्स हटवण्यात आल्या होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून दोन्ही राज्यांतून कमीत कमी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हिसार येथील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्राही आहे. या लोकांवर पाकिस्तानी हँडलर्सना संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. 11 मे रोजी पंजाब पोलिसांनी मालेरकोटला येथून दोघा जणांना ताब्यात घेतले होते. हरियाणा पोलिसांनी 13 मे आणि 15 मे रोजी दोघा जणांना अटक केली. 7 मे आणि 14 रोजी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.