राज्यांच्या सीमा सील, सीमावर्ती राज्यांमध्ये हाय अलर्ट
दिल्ली : खरा पंचनामा
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात सीमेलगत असलेल्या राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, निमलष्करी दलांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच, सार्वजनिक कार्यक्रमांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सीमेवर अंधाधूंद गोळीबार करण्यात येत आहे. अशातच जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पूंछच्या नागरी भागात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. लष्कराला रात्रभर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सीमवर्ती भागात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
राजस्थान पंजाबच्या सीमा सील करण्यात आल्या असून पंजाबमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सीमेवरील तणावामुळं मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत.
महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची, आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.