'राजीनामा द्या किंवा.', न्यायमूर्ती वर्मांना दिले दोन पर्याय?
घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणाचा चौकशी समितीचा अहवाल सादर
दिल्ली : खरा पंचनामा
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेनंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. कारण यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा रंगली. मात्र, आपल्या निवासस्थानी बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याचा आरोप यशवंत वर्मा यांनी फेटाळून लावला होता.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील घेतला होता. तसेच त्यानंतर न्यायाधीश यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. मात्र, वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे तेथे कोणतेही न्यायालयीन कामकाज सोपवण्यात आलं नसल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने न्यायाधीश यशवंत वर्मा निवासस्थानी रोख रक्कम आढळल्याची पुष्टी केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या समितीने भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना अहवाल सादर केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या अहवालाच्या निष्कर्षांवर यशवंत वर्मा यांना उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. या संदर्भातील वूत इंडिया टुडेनी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा देण्याचा पर्याय या अहवालात देण्यात आल्याचं इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच यशवंत वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर महाभियोग प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे या आठवड्याच्या अखेरीस सरन्यायाधीशांसमोर आपलं उत्तर सादर करण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.