Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धुळे रोकड प्रकरण, कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबितसभापती राम शिंदेंचा निर्णय

धुळे रोकड प्रकरण, कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित
सभापती राम शिंदेंचा निर्णय

मुंबई : खरा पंचनामा

धुळे येथे विधीमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली आहे.

माजी आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळ आमदाराच्या समितीतील सदस्यांना देण्यासाठी तब्बल साडेपाच कोटी रुपये विश्रामगृहात ठेवल्याचा आरोप केला होता. यानंतर या प्रकरणात विरोधकांकडून राज्य सरकारवर चारही बाजूने टीका होत होती. तर आता या प्रकरणात मोठा निर्णय घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येणार असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एसआयटी (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा अंदाज समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती. या खोलीची झडती घेतली असता या खोलीत 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपये सापडले आहे.

तर दुसरीकडे या समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी या प्रकरणात विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

समिती प्रमुख हे आमदार अर्जुन खोतकर असून समिती सदस्य आमदार काशिराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, सदाशिव खोत, राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अप्पर सचिव (समिती) दामोदर गायकर हे 11 जण उपस्थित असल्याल्या बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.