Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अलमट्टी धरणाच्या संदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

अलमट्टी धरणाच्या संदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : खरा पंचनामा

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली . या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. 

अलमट्टी धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्यांचा विचार करता या संदर्भात येत्या १५ दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, अशी माहिती यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. याबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठक घेणार असून,
राज्य सरकारने न्यायालयातही बाजू भक्कमपणे मांडली असल्याचे बैठकीत सांगितले.

जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह. वि. गुणाले यांनी विभागाच्या स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहीती दिली.

या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अरुण लाड, इद्रिस नायकवडी डॉ. विनयजी कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे व उल्हास पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह. वि. गुणाले आणि कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.